

सणासुदीच्या काळात खवा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणीकरिता घेवून आवश्यकत्या ठिकाणी जप्ती करावी, यामाध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची पाहणी करुन हे बांधकाम गतीने पूर्ण करुन प्रयोगशाळा सुरु करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट देवून विभागाच्यावतीने चालू वर्षातील कामकाजाचा आढावा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सहआयुक्त अन्न गिरीश हुकरे, सहआयुक्त सुरेश अन्नपुरे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व विजय नांगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अन्न विभागात नव्याने रुजू झालेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबंत संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. झिरवाळ यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
आढावा बैठकीत औषध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती, विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाया आदीबाबत माहिती देण्यात आली.