

अवसरी पारगाव रस्त्यावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा
अवसरी खुर्द तालुका आंबेगाव ते पारगाव रस्त्यावर सध्या रस्ता दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी मोरी टाकण्याचे काम सुरू आहे या संपूर्ण रस्त्यावर विजेच्या अभावामुळे रात्री प्रवास करताना काम सुरू असल्याचा कोठेही फलक ठेकेदाराने न लावल्यामुळे किंवा ज्या ठिकाणी मोरी टाकण्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक दिवा (रिफ्लेक्टर) न लावल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ठेकेदाराने एवढे मोठे काम सुरू असताना निष्काळजीपणे काम सुरू असल्याचा फलक न लावता धोकादायक पद्धतीने ऐन पावसाळ्यामध्ये काम सुरू आहे वाहन चालकाला रात्रीस काय दिवसा सुद्धा जवळ आल्यावरच लक्षात येते की येथे काम सुरू असून बाजूला मोठमोठे खड्डे आहेत, अशा निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळया यादीत टाकण्यात यावी अशी मागणी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे