



सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत माजी आमदार संजय जगताप यांनी यांनी आपला गड राखला असून प्रथमच सासवड नगरपरिषदेवर भाजपाचे कमळ फुलले आहे. नगराध्यक्षपद पदासह २२ पैकी १३ जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी तर ९ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयी मिळविला आहे.
नगराध्यक्ष निकाल
आरक्षण सर्वसाधारण :
१) विजयी उमेदवार : आनंदीकाकी चंदुकाका जगताप – भारतीय जनता पक्ष – ११३६२ मते
२)प्रमुख पराभूत : सचिन सुरेश भोंगळे – शिवसेना शिंदे गट – १०२७१ मते.
३)अभिजीत मधुकर जगताप – महाविकास आघाडी (शिवसेना ठाकरे) – ६८२ मते.
४) निकिता राजेंद्र धोत्रे – अपक्ष – ९८ मते
५) नोटा – १४४.
आनंदीकाकी जगताप १०९१ मताधिक्याने विजयी.
पक्षिय बलाबल : थेट नगराध्यक्ष सर्वसाधारण :आनंदीकाकी चंदुकाका जगताप (भाजपा).
२२ नगरसेवकांपैकी १३ भाजपा आणि ९ शिवसेनेचे सदस्य विजयी झाले आहेत.
मागील वेळेचे पक्षीय बलाबल : नगराध्यक्षपद – जनमत विकास आघाडी. आरक्षण : एस सी. नगरसेवक संख्या : १९ : जनमत विकास आघाडी- १५, राष्ट्रवादी काॅंग्रेस- २ शिवसेना – २.
प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्र. १ अ : ओबीसी महिला :विजयी – माधुरी तेजस राऊत १२०९ मते (शिवसेना). पराभूत – सारिका हिरामण हिवरकर ९५७ मते (भाजपा). नोटा ३३.
प्रभाग क्र. १ ब : सर्वसाधारण : विजयी – मनोहर ज्ञानोबा जगताप १११२ मते (भाजपा). पराभूत – शुभम अनिल जगताप १०३४ मते (शिवसेना). मनोज गोपाळ जगताप २९ मते (अपक्ष). नोटा २४.
प्रभाग क्र. २ अ : ओबीसी महिला : विजयी – लिना सौरभ वढणे ७५४ मते (भाजपा). पराभूत – ज्योती चंद्रकांत गिरमे ६०३ मते (शिवसेना). नोटा २२.
प्रभाग क्र. २ ब : सर्वसाधारण : विजयी – बाळासाहेब बापूराव भिंताडे ७५५ मते ( शिवसेना). पराभूत – दिनेश शशिकांत भिंताडे ६१३ मते (भाजपा). नोटा ११.
प्रभाग क्र. ३ अ : एससी महिला : विजयी – शितल प्रविण भोंडे १०१३ मते (भाजपा).
पराभूत – नंदा राहूल भोंडे ६२९ मते (शिवसेना), छाया आप्पा सकट ३१ मते (अपक्ष). नोटा १७.
प्रभाग क्र. ३ ब : सर्वसाधारण : विजयी – ज्ञानेश्वर गुलाबराव जगताप १०६९ (भाजपा). पराभूत – सुरज चंद्रकांत माने ५६४ मते (शिवसेना), रोहित महादू भोंडे २६ मते (अपक्ष). नोटा ३१.
प्रभाग क्र. ४ अ : एससी सर्वसाधारण : विजयी – सोपान एकनाथ रणपिसे १४४४ मते (भाजपा). पराभूत – अनिता पांडुरंग माने ९४० मते (शिवसेना). नोटा ४३.
प्रभाग क्र. ४ ब : सर्वसाधारण महिला : विजयी – स्मिता सुहास जगताप (भाजपा) बिनविरोध निवड.
प्रभाग क्र. ५ अ : सर्वसाधारण महिला : विजयी – रत्ना अमोल म्हेत्रे १५२१ मते (शिवसेना). पराभूत – मोनिका मनोज म्हेत्रे १२९० मते (भाजपा), अमृता दिगंबर म्हेत्रे १२० मते (अपक्ष). नोटा ३२.
प्रभाग क्र. ५ ब : सर्वसाधारण : विजयी – मंदार विजय गिरमे १६२७ मते ( शिवसेना). पराभूत- मयूर चंद्रकांत चौखंडे १३१० मते (भाजपा). नोटा २६.
प्रभाग क्र. ६ अ : सर्वसाधारण महिला : विजयी – अर्चना चंद्रशेखर जगताप १४५५ मते (भाजपा). पराभूत – सिंधू ज्ञानेश्वर जगताप ६४९ मते (शिवसेना). नोटा ४२.
प्रभाग क्र. ६ ब : सर्वसाधारण : विजयी – राजनभैया चंद्रशेखर जगताप १४९० मते (भाजपा). पराभूत – गणेश गुलाबराव जगताप ६२२ मते (शिवसेना). नोटा ३४.
प्रभाग क्र. ७ अ : सर्वसाधारण महिला : विजयी – स्मिता उमेश जगताप १४५९ मते (भाजपा). पराभूत – विद्या श्रीकांत टिळेकर १००२ (शिवसेना). नोटा ३४.
प्रभाग क्र. ७ ब : सर्वसाधारण : विजयी – वैभव बबनराव टकले १२७१ (शिवसेना). पराभूत – प्रविण काळूराम पवार ११९६ (भाजपा). नोटा २८.
प्रभाग क्र. ८ अ : ओबीसी सर्वसाधारण : विजयी – प्रितम सुधाकर म्हेत्रे ९७२ मते ( शिवसेना). पराभूत – सूहास दत्तात्रेय लांडगे ७९७ मते (भाजपा). नोटा २२.
प्रभाग क्र. ८ ब : सर्वसाधारण महिला : विजयी – दिपाली अक्षराज जगताप ९३४ मते (शिवसेना). पराभूत – सुमाली संदीप राऊत ८३४ मते (भाजपा). नोटा २३.
प्रभाग क्र. ९ अ : ओबीसी सर्वसाधारण : विजयी – प्रदीप काशिनाथ राऊत ६८४ मते (भाजपा). पराभूत – मंगेश रमेश भिंताडे ५८३ मते (शिवसेना). नोटा १८.
प्रभाग क्र. ९ ब : सर्वसाधारण महिला : विजयी – प्रियांका साकेत जगताप ९३८ मते (भाजपा). पराभूत – डॉ. अस्मिता पोखर्निकर – रणपिसे ३१७ मते (शिवसेना ), छाया सुनील सुभागडे १० मते (अपक्ष). नोटा २०.
प्रभाग क्र. १० अ : ओबीसी सर्वसाधारण : विजयी – ज्ञानेश्वर साधू गिरमे ९३६ मते (भाजपा). पराभूत – सुनिल विनायक पवार ९०९ मते (शिवसेना). नोटा ५४.
प्रभाग क्र. १० ब : सर्वसाधारण महिला : विजयी – शिल्पा संदीप जगताप ९५४ मते (शिवसेना). पराभूत – दिप्ती सुभाष सुर्यवंशी ९०८ मते (भाजपा). नोटा ३७.
प्रभाग क्र. ११ अ : हेमलता मिलींद इनामके (शिवसेना) बिनविरोध.
प्रभाग क्र. ११ ब : सर्वसाधारण : विजयी – अजित काळूराम जगताप १६६६ मते (भाजपा). पराभूत – डॉ. राजेश विजय दळवी ५८६ मते (शिवसेना). नोटा ३१.