
“देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असणाऱ्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली यात सी.पी.राधाकृष्णन हे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. इंडिया आघाडी कडून सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक लढवली तर एनडीए कडून राधाकृष्णन यांनी निवडणूक लढवली. राधाकृष्णन यांचा १५२ मतांनी विजय झाला आहे. सुदर्शन रेड्डी यांना ३०० तर राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली.१५ मते अवैध ठरली. सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असणार आहेत…