
शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरी करणाऱ्या चौघांना कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई
पुणे- पुणे शहरात शस्त्राचा धाक दाखवत जबरदस्तीने मोबाईल चोरी करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या १२ तासांत जेरबंद करत चार गुन्ह्यांचा छडा लावला. पोलिसांनी सुमारे १.५ लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
पुणे शहरात मोबाईल व वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर लगाम घालण्यासाठी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई पार पडली.
गुप्त माहितीवरून धाडसी कारवाई
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गु.र.नं. ६१/२०२५ नुसार दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस शिपाई राहुल वेताळ यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची ठिकाणाची खबर मिळाली. क्वीन्स गार्डनजवळ रेल्वे पटरीच्या बाजूला हे संशयित सापडले. पोलिसांनी हटकले असता चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र शिताफीने पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले.
अटक केलेले आरोपी:
- सिद्धार्थ उमेश मोरे (वय १९), रा. ताडीवाला रोड
- कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी धनगर (वय २१), रा. बंडगार्डन परिसर
- आर्यन संभाजी वाघमारे (वय १९), रा. लोकसेवा वसाहत
- विधीसंघर्षीत बालक – नाव गुप्त
तपासात उघडकीस आलेला मुद्देमाल:
०४ मोबाईल फोन्स
सुझुकी बर्गमेन स्कूटी
एक धारदार शस्त्र
₹३०० रोख
एकूण किंमत – अंदाजे ₹१,५०,०००/
चार गुन्हे उघड, दोन पोलीस ठाण्यांचे गुन्हे उघडकीस
क्र. पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक व कलम
1)कोरेगाव पार्क गु.र.नं. ६१/२०२५ – BNS कलम ३०९(४), ३(५), ११५, ३५१(३), शस्त्र कायदा कलम ४(२५)
2)कोरेगाव पार्क गु.र.नं. ६४/२०२५ – BNS कलम ३०९(४), ३(५), ११५, ३५१(३), शस्त्र कायदा कलम ४(२५)
3)कोरेगाव पार्क गु.र.नं. ६५/२०२५ – BNS कलम ३०९(४), ३(५), ११५, ३५१(३), शस्त्र कायदा कलम ४(२५)
4)वानवडी गु.र.नं. २६६/२०२५ – IPC कलम ३०९(४), ३(५)
प्रशंसनीय तपासकार्य
सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन शर्मा, अपर आयुक्त राजेंद्र बनसोडे, उप आयुक्त मिलिंद मोहिते, आणि सहाय्यक आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे, पोनि संगीता जाधव, आणि पो.उ.नि. श्रीकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकात हरुन पठाण, मयूर शिंदे, प्रवीण पडवळ, संदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे, अमित जाधव, अंकुश खंडसोळे यांचा समावेश होता.
पुढील तपास:
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण करत आहेत.