शिरूर तालुक्यातील मलठण जवळील घटना

शिरूर तालुक्यातील मलठण च्या पुढे अष्टविनायक महामार्गावर पावर हाऊस जवळ झालेल्या दुचाकी व चार चाकी चा अपघातात दुचाकी वरील वीस वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान घड ल्याची माहिती शिरूर पोलीस यांनी दिली. याप्रकरणी कैलास कुळके वय 35 राहणार कवठे यमाई तालुका शिरूर यांनी शिरूर पोलिसात तक्रार, फिर्याद दाखल केली आहे. या अपघाताबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 22 ला रात्री साडेनऊच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावर शिंदेवाडी मलठण गावच्या हद्दीत टीसी कृषी सेवा केंद्र जवळ झालेल्या अपघातात फिर्यादी कुळके यांचा भाचा गणेश रामदास शितकल वय 19 राहणार कवठे यमाई हा दुचाकी वरून चाललेला असताना समोरून येणारी महिंद्रा कंपनीची छोटा हत्ती सुप्रिमू चार चाकी मालवाहतूक गाडी च्य अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भराधा व वेगात चालवून बाजू सोडून चुकीच्या साईटला येऊन गणेश शीतकल यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या अपघातात गणेशला गंभीर जखमा झाल्याने अपघातामध्ये गणेशचा मृत्यू झाला तर अपघाताबाबत चार चाकी गाडीचा चालक अपघाताची खबर न देता व जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघातग्रस्त टेम्पो घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. तर या घटनेचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपाशी अंमलदार पोलीस हवालदार बनकर करत आहेत. यावर्षी कवठे ते मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मलठण ते कवठे यमाई हद्दी दरम्यान अष्टविनायक महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी केली आहे.— विशेष प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे,शिरूर,पुणे