
पुण्यात गेल्या दोन दिवसात वरून राजाचे आगमन झाल्याने उजनीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून यामुळे उजनी काटा वरील शेतकरी सुखावला असून आनंदित शेतकऱ्यांनी आज उजनीच्या पाण्याचे जलपूजन सोलापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोलापूर जिल्हा परिषदच्या सदस्या वनिता गुळवे यांच्या हस्ते केले. दोनच दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी वीज आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारचे एल्गार करून आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु निसर्गाची किमया पाणी हेच जीवन यानुसार दुसऱ्या दिवशी या शेतकऱ्यांनी जलपूजन करत आपला आनंद उत्सव साजरा केला यावेळी सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या वनिता गुळवे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ लकडे, मकाई कारखान्याचे माजी संचालक अजित आण्णा रणदिवे टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख नाना गुळवे, राजेंद्र धांडे देविदास साळुंखे, आजिनाथ लाळगे, यांच्यासह धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.