3 hectares of land allotted to the Pandharpur Vitthal-Rukmini Temple Committee for the conservation of cows and the convenience of devotees.

Photo of author

By Sandhya

गोमाता संवर्धन, भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा*

• महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई / दै. संध्या : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पंढरपूरच्या यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे. आणि ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ याठिकाणी उभारण्यात येणार आहे.
तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी (गोमाता संवर्धन व भाविकांची सुविधा) या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील .ज्या कामासाठी जमीन दिली आहे, केवळ त्याच कामासाठी तिचा वापर करता येईल; इतर कोणत्याही तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाईल.

Leave a Comment

You cannot copy content of this page