लक्ष्मण हाके : ओबीसींना धक्‍का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं…

Photo of author

By Sandhya

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडिगोद्री यथे ओबीसींसाठी उपोषण सुरू केलं आहे. हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. आज सरकारी शिष्‍टमंडळाने हाकेंची उपोषणस्‍थळी भेट घेतली. गिरीश महाजन, अतुल सावे आणि उदय सामंत हे हाकेंच्या भेटीला आले आहेत.

यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांची शिष्‍टमंडळासमोरच घोषणाबाजी सुरू केली. यामुळे येथे गोंधळ सुरू झाला. दरम्‍यान गिरीश महाजन यांनी सरकार कुणावराही अन्याय करणार नसल्‍याचे सांगितले. दरम्‍यान हाके यांनीओबीसींना धक्‍का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं अशी भूमीका घेतली.

मनोज जरांगे आणि सरकारपैकी नेमकं खरं कोण बोलतंय ? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी महाजन यांच्यासह सरकारी शिष्‍टमंडळाला केला. त्‍यावर गिरीष महाजन यांनी सरकार कोणत्‍याही समाजावर अन्याय करणार नाही. तुम्‍ही तुमचे शिष्‍टमंडळ चर्चेसाठी पाठवावं असं सांगितलं.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सरकार योग्‍य तोच निर्णय घेईल अशी भूमीका गिरीश महाजन यांनी मांडली. आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका : हाके आपण सरकारला आणखी एक संधी देऊ अशी भूमीका हाके यांनी मांडली. यावेळी हाकेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सरकारने दुटप्पी भूमिका घेऊ नये असं आंदोलकांचं म्‍हणण होतं. दरम्‍यान हाके यांनी आंदोलकांना आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका असं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी आंदोलनसस्‍थळी यावं अशी मागणी केली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का लागायला नको अशी मागणी हाके यांनी केली.

दरम्‍यान यावेळी हाके यांना फडणवीसांचा फोन आला. त्‍यांच्याशी त्‍यांनी चर्चा केली. यानंतर हाके यांची मुख्यमंत्र्यांशीही फोनवर चर्चा झाली. दरम्‍यान हाकेंच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भुजबळांच्या नेतृत्‍वात शिष्‍टमंडळ आज सरकारशी चर्चा करणार आहे.

Leave a Comment