अतिशय धक्कादायक..! शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

Photo of author

By Sandhya

बेदम मारहाण

खासगी शिकवणी लावलेल्या क्लासमधील शिक्षिकेने दहा वर्षीय विद्यार्थिनीला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या कानाखाली मारल्याने मुलगी गंभीर झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. 

नालासोपारा परिसरात हि घटना घडली आहे. यात दहा वर्षीय विद्यार्थिनी हि खासगी शिकवणीसाठी रत्ना सिंग यांच्या जात असते. दरम्यान कलासमध्ये क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्‍या रत्ना सिंग या शिक्षिकेने मुलीच्या कानाखाली जोरदार चापट मारली.

यामुळे कानात असलेली बाही मानेत घुसल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखम दुरुस्त होत नसल्याने मुलीच्या आई- वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

दरम्यान या मारहाणीत मुलीच्या श्वसनलिकेसह मेंदूला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मागील ८ दिवसांपासून ती कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर सदर प्रकाराबाबत मुलीच्या आई- वडिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच पोलिसांनी रत्ना सिंग याना नोटीस बजावली आहे.

Leave a Comment