बारामती शहर पोलिसांची कामगिरी कोयत्याने वार करून झाला होता बारामतीत युवकाचा खून..
बारामतीत कोयत्याने वार करून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाणे तपासाची चक्र फिरवत बारा तासाच्या आत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींनी हा खून नशेच्या आदिन जाऊन केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी शहरातील सुज्ञ पालकांनी आपली मुले काय करतात तसेच त्यांच्या सोशल मीडियाकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असं आवाहन देखील बिरादार यांनी बारामतीकरांना केलय..