
कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार ठरले अपयशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका
नागपूर : सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. जनतेच हित न साधता स्वतःच हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली.
राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य हे सरकार सतत म्हणत असलं तरी मागच्या अधिवेशनाची परिस्थिती पाहिली तर राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेल असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. 5 डिसेंबरला शपथविधी होऊन सरकारला खाते वाटप करता आले नाही, असा टोला दानवे यांनी रखडलेल्या खातेवाटपावर लगावला
सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्या भाषणावर उत्तर देताना आमचं सरकार आलं तर अस होत त्यांचं सरकार आलं तेव्हा तस होत असं म्हटले. दोन्ही उपमुख्यमंत्री त्या काळात मंत्रिमंडळात सहभागी होते हे सोयीने विसरले अशा शब्दात दानवे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या उत्तरावर टीका केली.
गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवल्याने दानवे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले.
राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत पहिला क्रमांक
उत्तर प्रदेशचा असून 1 महाराष्ट्र 2 ऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षात सरासरी 126 गुन्हयाची नोंद झाली आहे. 2023 मध्ये 45 हजार 434 महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या असून सायबर गुन्ह्यात राज्य 4 थ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.