
बारामतीत युगेंद्र पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर
विविध समस्यांसंदर्भात तहसीलदार स्वप्नील रावडे यांची घेतली भेट
बारामती – बारामती तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व अडचणींसंदर्भात तहसीलदार स्वप्नील रावडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.तसेच तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी दौरे करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पिण्याचे पाणी,जनावरांसाठी पाणी तसेच सिंचनाच्या पाण्यासह विविध समस्या व अडचणींचा आढावा घेत आहे.या भेटीदरम्यान तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, प्रलंबित समस्या व अडचणी प्रशासकीय प्रमुख म्हणून आपल्या निर्दशनास आणून देण्यासाठी आलो आहे,असेही नमूद केले.
विशेषतः सध्या वाढत असलेल्या तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सिंचनाच्या समस्या,पाणीटंचाई, वीजपुरवठ्यातील अडथळे तसेच शेतीपिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात,अशीही मागणी यावेळी केली.तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत असून,टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढविणे,विहिरी व जलस्रोतांची स्वच्छता तसेच जलसंधारण कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही युगेंद्र पवार यांनी तहसीलदारांना सांगितले.