पुणे | बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर पुण्यात राहायला जागा नाही – पोलीस आयुक्तांचा दम

Photo of author

By Sandhya


पुणे  : बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली, किंवा बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर हे शहर सोडून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ. काहींना मस्ती आली आहे. त्यांना सक्त ताकीद आहे. बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा, अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुन्हा एकदा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.

पोलीस आयुक्त म्हणाले, शहरातील मंगळसूत्र, गळ्यातील सोन साखळी यामागे एक भावना असते. प्रत्येकाला ते परत मिळेल अशी अपेक्षा नसते. न्यायालयीन प्रक्रिया तसेच वकिलांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हीच पुढाकार घेतला आणि नागरिकांची आर्थिक नुकसान टाळत त्यांना लवकर त्यांचा मुद्देमाल मिळेल, अशी व्यवस्था केली.

शहरातील इतरही परिमंडळात हा उपक्रम घेतला जाईल. काही लोकांना मस्ती आलेली आहे. त्यांना ताकीद दिली आहे. तरीही ते मस्तीत आहेत

परिमंडळ पाचमधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील ८० तक्रारदारांना चोरीस गेलाला दोन कोटी रुपयांचा किंमती मुद्देमाल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पुन्हा प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त मनोज पाटील, प्रविण पाटील, शैलेश बलकवडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page