
आळेफाटा पोलिसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार, मोटारसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद करून एकूण 31 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शुभम भाऊसाहेब घुले आदित्य सुदाम केदारी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दि. 7 ऑकटोबर 2024 रोजी श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ,आळे यांनी त्यांची मारुती सुझुकी कंपनीची इको कार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे हे तपास करीत असताना गुन्ह्यात चोरी केलेली मारुती सुझुकी इको कार चालवत नेताना काहीजण सापडले. त्यांना थांबून त्यांच्याकडे इको कारबाबत चौकशी केली असता त्यांनी कार चोरल्याची कबुली देतानाच अधिक चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी , टायर चोरीचे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात रोशन गोरक्षनाथ भवर कृष्णा सोमनाथ शेजूळ , आकाश शेंगाळ यांच्याबरोबर मिळून केल्याचे सांगितले. यातील रोशन गोरक्षनाथ भवर याला तसेच टायर चोरीमध्ये सुनील सुरेश मधे उर्फ सुनील रामदास भुतांब्रे हा सामील असल्याने त्यालाही टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपींनी कार, टायर, मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून 20 गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रा डुंबरे,पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, अमित पोळ, पंकज पारखे, पुरुषोत्तम थोरात, सुनील गिरी, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, शैलेश वाघमारे, गणेश जगताप, गणेश सपकाळ, किरण शेळके, संतोष साळुंखे यांनी केली आहे