बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई

Photo of author

By Sandhya

स्थानबद्ध करुन गुंडाची नागपूर कारागृहात रवानगी

बारामती-पुणे ग्रामीण जिल्ह्यात सामान्य लोकांना धमकावून गुन्हे करणारे,अंमली पदार्थ विक्री करणारे,अवैध वाळू व्यवसाय करणारे,अवैध दारू विक्री करणारे तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्ध मा.संदिपसिंग गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी विशेष मोहीम राबवून कारवाई करत पुणे ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत.यावरून बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हंबीर बोळ,बारामती येथे वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार गणेश तुळशिराम पवार,वय-33 वर्ष,रा-हंबीर बोळ,बारामती,ता-बारामती,जि.पुणे याचेविरुद्ध यापूर्वी भांडण-तंटा,खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याने त्याची दहशत बारामती शहर व ग्रामीण परिसरात असल्याने त्याचेवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कार्यवाही होणेबाबत श्रीशैल चिवडशेट्टी पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी मा.संदिपसिंग गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा.संदिपसिंग गिल पोलीस अधीक्षक यांनी प्रस्ताव पुढील कार्यवाही करिता मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला.मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे,मा.जितेंद्र डुडीसो यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन 1981(सुधारणा 2025) अन्वये धोकादायक व्यक्ती सदरान्वये गणेश तुळशिराम पवार यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केला आहे.त्या आदेशानुसार संबंधित इसमास ताब्यात घेवून त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे एक वर्षाकरिता स्थानबद्ध रवानगी करण्यात आली.सदर इसमाप्रमाणे आणखी गुंड प्रवृत्ती करणारे लोकांवर तसेच अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर आगामी काळात मा.जिल्हाधिकारी,पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविणार असलेबाबत श्रीशैल चिवडशेट्टी(पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांनी सांगितले आहे.सदर कामगिरी मा.संदिपसिंग गिल(पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण),मा.गणेश बिरादार(अप्पर पोलीस अधीक्षक बारामती),मा.सुदर्शन राठोड(उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर(पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण),श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन),सतिष राऊत,रत्नदीप भंडारे(पोलीस उपनिरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन),पोलीस अंमलदार महेश बनकर(स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण),पोलीस अंमलदार सागर जामदार,अभिजीत कांबळे,सुलतान डांगे,रामचंद्र शिंदे,उदय टावरे,यशवंत पवार,अक्षय सिताप,अमोल देवकाते,विशाल चौधर,पोपट कवितके,वैभव मदने,विशाल शिंदे,गिरीष नेवसे,रईस मुलाणी,राहुल बडे(बारामती शहर पोलीस स्टेशन) यांनी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page