दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार व जय पवार यांचे अभिवादन

Photo of author

By Sandhya

बारामती, दि. २२ जुलै : राज्याचे लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मध्यरात्री १२ वाजता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि श्री.जय अजितदादा पवार यांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान परिसरातील दादांच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.

यावेळी दादांच्या कार्याचा, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.

अजितदादा पवार यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page