Mrs. Sunetra Ajitdada Pawar took oath as Deputy Chief Minister; Elected as the party’s legislative party leader…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची नोंद…
मुंबई ( दै. संध्या ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी आज विधानभवनात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता बैठक पार पडली.
या बैठकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली तर विधीमंडळ पक्षनेता म्हणून व्हिप काढण्याचे तसेच विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत असल्याचे दोन ठराव ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले तर दोन्ही ठरावाला मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीला ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मनोज कायंदे, आमदार सुलभा खोडके, आमदार राजू कारेमोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार राजेश विटेकर, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सना मलिक, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार शंकर मांडेकर, आमदार सुनील शेळके, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानसभा मुख्य प्रतोद आमदार चेतन तुपे, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार संग्राम जगताप, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार सचिन पाटील, आमदार शेखर निकम, विधानपरिषद मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार संजय खोडके आदींसह माजी मंत्री नवाब मलिक, माजी आमदार झिशान सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, अल्पसंख्याक नेते नजीब मुल्ला, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.
विधीमंडळ पक्षनेता निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,माजी मंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री संजय बनसोडे,माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट घेतली.
सायंकाळी पाच वाजता लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शपथ घेतली.