सासवड परिसरातील शिवालयांतून घुमला हरहर महादेवचा गजर..

Photo of author

By Sandhya

The sound of Harhar Mahadev echoed from the Shiva temples in the Saswad area.


महाशिवरात्रीच्या निमित्ताने सासवड परिसरातील विविध शिवमंदिरात अभिषेक, महापुजा, भाविकांची दर्शनासाठी गर्दी, महाप्रसाद वाटप, आकर्षक मंदिर सजावट, भजन, हरिनाम सप्ताह आदी उपक्रमांनी
शिवशंभु चा जागर करून हा दिवस मोठ्या भक्तिभावाने
साजरा करण्यात आला. परिसरात दिवसभर सर्वच प्रमुख
मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
कऱ्हानदीच्या काठावरील निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात महांकाल स्वरूपात शिवलिंगाची सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री रुद्राभिषेक, सिद्धेश्वर भजनी मंडळाचे एकतारी भजन
सकाळी केतकावळे येथील बालाजी मंदिर देवस्थानच्या
वतीने नित्यपुजा, दिवसभर भाविकांसाठी प्रशांत ज्ञानोबा
जगताप (पुणे) यांच्या वतीने महाप्रसाद वाटप, सायंकाळी
शिवशंभो ग्रुपच्या वतीने शेजारती , डॉ प्रवीण जगताप, नंदू बापू जगताप व किरणकुमार जगताप यांची आकर्षक मंदिर सजावट व परिसरातील शेतकऱ्यांचे नियोजन या
मुळे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
पुरातन चांगावटेश्वर मंदिरातही प्रथमप्रहरी व्यवस्थापक पिंटू जगताप यांच्या हस्ते व अक्षय बेलसरे यांच्या पौरोहित्याखाली रुद्र अभिषेक करण्यात आला.त्यानंतर
भाविकांचे अभिषेक पार पडले. लक्ष्मी नारायण मंदिर च्या वतीने हभप निलेश महाराज शिंदे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंदिरात केले होते. हडपसर येथील शिवभक्त अमोल हिंगणे व कै. दीपक म्हेत्रे परिवाराकडून
भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. मंदिर सुधार समितीच्या वतीने विद्युत रोषणाई, फुलांची सजावट
दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. विशाल जंगम, परशुराम देशमुख, सुनिल कामथे, चेतन एक्के, अक्षय गोडसे, धैर्यशील देशमुख
आदींनी सोहळ्याचे आयोजन केले होते. शहरातील कऱ्हा व चांबळी नद्यांच्या संगमावरील प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर येथे देखील भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्व परिसर शिवभक्तीने फुलून गेला होता

Leave a Comment

You cannot copy content of this page