तब्बल ३५ मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास सापळा रचून लक्ष्मी नगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Photo of author

By Sandhya

Laxmi Nagar police foiled a persistent thief who stole as many as 35 mobile phones


वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार कादिर शेख व पोलीस अंमलदार अतुल जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, एक इसम येरवडा येथील शादल बाबा चौक कमानीजवळ मोबाईल विक्रीकरिता येणार आहे. ही बातमी तपास अधिकारी रविकांत नंदनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सांगितली सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदनवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना लगेच कळवली, या बातमीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार कादिर शेख, अतुल जाधव, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड, सुरज ओंबासे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन आडोशाला उभे राहून पाहणी केली पाहणी केल्यानंतर सदर इसमावर त्यांना संशय आला, लगेचच त्या इस बाला पोलिसांनी हटकले त्यानंतर तो इसम कावरा बावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला वरील स्टाफ ने त्याला पकडून त्याची विचारपूस केली त्या इसमाने त्याचे नाव विष्णू रतनलाल मावर राहणार समाधान चौक ससून हॉस्पिटल येथे राहत असूनअसे मूळ गाव गड अमावरा ,राजस्थान असे त्याने सांगितले.
त्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन मिळून आल्याने त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असता त्याच्याकडून आणखी ३४ मोबाईल हस्तगत करण्यात आले असे एकूण विष्णू रतनलाल मावर याच्याकडून तब्बल ३५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलमुला, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, तब्बल ३५ मोबाईल फोन पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page