130 hotels in Jejuri are on the verge of closing down due to lack of commercial cylinders


शिष्ट मंडळ भुजबळांना भेटणार.
जेजुरी वार्ताहर दिनांक 26 महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत यात्रा, जत्रा, लग्न सराई शाळांना लागलेल्या सुट्ट्या यामुळे भाविकांची संख्या वाढत आहे. मात्र भाविकांवर अवलंबून असणारे हॉटेल व्यावसायिक व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अडचणीत आले असून, हीच परिस्थिती कायम राहिल्यास येथील सुमारे 130 हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
आखाती देशात युद्धाचा भडका उडाला असून या युद्धामुळे गॅस,पेट्रोल, डिझेल या इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. हॉटेल्स व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने आणि पर्यायी साधने परवड नसल्याने हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोशियशनच्या वतीने पत्रकार परिषद घेवून आपल्या अडचणी मांडल्या आहेत.
जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाची नगरी असून यात्रा जत्रा, लग्न सराई, शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि भाविकांचे कुलधर्म कुलाचार यामुळे भाविकांची संख्या वाढली आहे. त्यातच आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धामुळे गॅस आणि इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांना कोणतेही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने व्यवसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने 20 टक्के व्यवसायिक गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करूनही अद्याप 15 दिवसात एक ही सिलेंडर उपलब्ध न झाल्याने जेजुरीत सुमारे 130 हॉटेल, धाबे, व खाद्य पदार्थांचे दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे असोसिएशनचे प्रमुख विजय झगडे यांनी सांगितले.
तसेच गॅस ला पर्याय म्हणून हॉटेल मध्ये सरपण, कोळसा आणून चुलीवर पदार्थ तयार केले जात आहेत, सुमारे दीडशे पदार्थांपैकी केवळ दहा बारा भाज्या व पदार्थ तयार केले जात आहेत. हॉटेल बंद केले तर कामगार निघून जातील, पुन्हा कामगार मिळणार नाही या भीती पोटी हॉटेल कसे बसे चालविले जात आहे. जेजुरीत येणारे भाविक व नागरिकांना हवे ते नाष्टा , जेवण उपलब्ध नसल्याने भाविकांची संख्या रोडवल्यास हॉटेल बंद पडणार आहे. जेजुरी येथील यात्रा जत्रा तीर्थक्षेत्र नगरीत शासनाने गॅस उपलब्ध करून द्यावेत यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे शिष्ट मंडळ अन्न प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना भेटणार असल्याचे ही विजय झगडे यांनी सांगितले.
यावेळी हॉटेल व्यावसायिक आप्पा बयास, पंकज रहाटेकर,गणेश गाढवे,अक्षय दरेकर आदींनी अडचणी मांडल्या.
जेजुरी येथील शहीद शंकर शिंदे गॅस एजेंसी चे संचालक सागर शिंदे यांनी दिनांक 7 मार्च पासून आपल्याकडे व्यवसायिक गॅस उपलब्ध झाले नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार घरगुती, हॉस्पिटल, तसेच शैक्षणिक संस्थांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.
या बाबत तालुका पुरवठा आधिकारी गोपाळ ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आखाती युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई असून शासनाच्या आदेशा नुसार व्यवसायिक गॅस सिलेंडर हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था तसेच अत्यावश्यक सेवेना प्रथम दिले जात असून असोशियशन च्या समस्या वरिष्ठा पर्यंत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जेजुरीत व्यवसायिक गॅस सिलेंडर चां काळाबाजार होत असून काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका यावेळी उपस्थित करण्यात आली.
या पत्रकार परिषदेस हॉटेल्स असोशियशंनचे विजय झगडे, आप्पा बयास, पंकज राहटेकर , अक्षय दरेकर, गणेश गाढवे, अभिजित कुदळे, धनंजय गोडसे, मल्लु कोळी, योगेश भाप कर, अविनाश हरपळे ,शब्बीर तांबोळी,आदी शंभराहून अधिक हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.