डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नियोजन बैठक संपन्न.

Photo of author

By Sandhya

Planning meeting on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti concluded.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व्हावी या साठी सर्व खाते प्रमुखांना सूचना दिल्या

पुणे, दि. २७ मार्च २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त आवश्यक नियोजनाबाबत पुणे महापौर दालनात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक व कार्डियाक अॅम्ब्युलन्सची नियुक्ती, विद्युत रोषणाई, अग्निशमन व्यवस्था, महापालिका सुरक्षा, मोबाईल टॉयलेट, मंडप, स्टेज, टेबल-खुर्ची तसेच मदत कक्ष उभारणी यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय सम्राट अशोक स्तंभाची देखभाल व दुरुस्ती, तसेच दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी आणि डी.पी. रोड, औंध येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
मा.उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांच्या नियोजनानुसार ३० मार्च रोजी विश्रांतवाडी येथे आणि ३१ मार्च रोजी पुणे स्टेशन परिसरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे पुढील बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत महापौर मा. सौ. मंजुषा नागपूरे व उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी प्रशासनाला सर्व नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस ,मा.निलेश आल्हाट,सभासद,पुणे महानगरपालिका,मा. ओमप्रकाश दिवटे ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), मा.हिम्मत जाधव, डी.सी.पी. ट्राफिक,पुणे, मा.संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (बंडगार्डन,पुणे), मा. श्रीमती संगीता देसाडला,कार्यकारी अभियंता ,भवन विभाग, मा.धनंजय पिंगळे, ट्राफिक विभाग, मा.श्रीमती आशा राऊत,उपायुक्त ,सुरक्षा विभाग, मा. माधव जगताप, उपायुक्त झोन क्र.०१ , मा.रवी पवार उपायुक्त कर आकारणी कर संकलन विभाग, डॉ. अशोक घोरपडे सह महापलिका आयुक्त उद्यान विभाग, मा.सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण विभाग, मा.अविनाश सकपाळ, उपायुक्त घनकचरा विभाग, मा.वसुंधरा बारवे उपायुक्त शिक्षण विभाग,मा.बिपीन शिंदे पुणे मुख्य अभियंता भवन विभाग, मा.नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग, मा. हांडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.श्रीमती संगीता जाधव, पोलिस निरीक्षक येरवडा वाहतूक मा.श्रीमती निशिगंधा शिंगे, येरवडा वाहतूक विभाग, मा.संदीप माढाले, फरासखाना विभाग,मा.कुणाल धुमाळ, मा.रमेश शेळके, मा.राकेश विटकर सुरक्षा अधिकारी, मा.प्रमोद उंडे कार्यकारी अभियंता विद्युत विभाग,मा.सुनिल यादव कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, मा.सहायक आरोग्य अधिकारी मा.डॉ.सुनिल आंधळे,मा.श्रीमती प्रज्ञा पवार सहा.महापालिका आयुक्त मा.विजय भिलारे सहायक विभागीय अधिकारी अग्निशामक विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page