
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
बारामती – क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रमणीनगर बौद्ध विहार महिला समितीच्या वतीने दि.11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचे निमंत्रक आरती मारुतीराव शेंडगे (गव्हाळे) विरोधी पक्षनेते बारामती नगरपरिषद यांनी आयोजन केले आहे.दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत ब्लड/रक्त तपासणी करण्यात येणार आहे.पुण्यातील सुप्रसिद्ध बुधराणी हाॅस्पिटल यांचे मोफत मोतीबिंदू निदान तसेच नेत्र तपासणी शिबिर,मोफत दंत तपासणी, इ.सी.जी,आरोग्य तपासणी शिबिर व युगेंद्रदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दि.12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी विशेष स्पर्धा,होम मिनिस्टर,फनी गेम्स् ,थोर महान महिलांची वेशभुषा स्पर्धा,2 ते 3 मिनिटांचे प्रभावी भाषण,लेझीम नृत्यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
दि.13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 10 वाजता चंद्रमणीनगर बौद्ध विहार येथून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुजा पाठाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन चंद्रमणीनगर बौद्ध विहार महिला समिती,बारामती शहर बौद्ध युवक संघटना, चंद्रमणीनगर,कै.मारूतीराव शेंडगे मित्र मंडळ,संविधान युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे.आयोजित केलेले सर्व कार्यक्रम चंद्रमणीनगर बौद्ध विहार,आमराई,बारामती याठिकाणी होणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आरती मारुतीराव शेंडगे (गव्हाळे) यांनी केले आहे.