


महामानवाची जयंती समाजासाठी प्रेरणादायक-डॉ.हुलगेश चलवादी
‘विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अधिकार अभियाना”चे ब्रिगेडियर (नि) सुमित रे यांच्या हस्ते उद्धाटन
‘संविधान से सन्मान’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन
असंख्य कष्ट सोसून अवघ्या देशातील पीडित, वंचित, उपेक्षितांना समता-बंधुता-न्याय मिळवून देत सामाजिक क्रांती घडवणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रर्वतक ठरले. बोधिसत्व बाबासाहेबांची जयंती समाजासाठी प्रेरणादायक तसेच संघर्षाची आठवण करून देणारी ठरते. आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे सुरु ठेवण्याची जवाबदारी आपली तसेच येणाऱ्या पिढीची आहे, याची जाणीव जयंती करून देते; अश्या शब्दात चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी ‘भीमजयंती’ निमित्त डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.
विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित “विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अधिकार अभियानाचे’ उद्घाटन ब्रिगेडियर (नि) सुमित रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.चलवादी बोलत होते. कार्यक्रमात ऍड.रेणुका चलवादी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिर्के, प्राचार्य स्मिता लोंढे , व्यवस्थापिका सायली शिंदे, उप-प्राचार्य जयश्री कदम, बीना कदम, ज्योती सचदेव, अश्विनी मोहिते, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.
अभियान उद्घाटनापूर्वी विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना व संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अधिकार अभियानामध्ये शिक्षण , रोजगार , स्वयंरोजगार, आरोग्य, कायदा विषयक सल्ला व सर्व प्रकारच्या शासकीय योजनेची माहिती देण्यात येणार आहे. संबंधित प्रमाणपत्र मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांचे फॉर्म भरून घेत संबंधित प्रत्येक नागरिकाला त्याचा मोफत लाभ करून देणार येईल, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले .