Second verification of expenses of candidates in Baramati Assembly by-elections completed

Photo of author

By Sandhya

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी आज पूर्ण केली.

या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन टप्प्यांत तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पार पडली होती, तर दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. तिसरी आणि अंतिम तपासणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.

आज झालेल्या तपासणीदरम्यान २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्चाचा अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. सादर करण्यात आलेल्या खर्चाच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) प्रमुख श्री. लोदडे तसेच खर्च पथकातील सदस्य अशोक शिरतोडे, स्वप्नील आपुणे, स्वाती दराडे, अक्षय मांडवे, प्राची सपकाळ आणि सागर जगताप उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक रामनाईक यांनी अकाउंटिंग, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम (VST) तसेच तक्रार निवारण पथक यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page