Police found a dead infant in Amrai area of ​​Baramati.Who is the infant? Police are searching for.

Photo of author

By Sandhya

बारामतीतील आमराई परिसरात पोलिसांना सापडलं मृत्त अवस्थेत अर्भक…. अर्भक कोणाचं पोलीस घेत आहेत शोध……

बारामतीतील आमराई परिसरात एक अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. हे अर्भक नेमके कुणी आणि कशासाठी येथे टाकले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. परंतु या प्रकरणाबाबत पोलिसांकडेही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अर्भक पाहण्यासाठी नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे……

Leave a Comment

You cannot copy content of this page