

बारामती दूध संघाच्या चेअरमन पदी किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमन पदी पुरुषोत्तम गाढवे यांची निवड
बारामती – बारामती दूध संघाची प्रगती स्व.अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे झाली असून मा.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.पार्थ दादा पवार,खासदार,राज्यसभा तसेच युवा नेते मा.जय दादा पवार यांचे वेळोवेळी दूध संघाला मार्गदर्शन होत असते.संघाचे चेअरमन श्री.संजय रामचंद्र कोकरे व व्हाईस चेअरमन श्री.दत्तात्रय सदाशिव वावगे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड मा.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची सूचनेनुसार आज 05/06/2026 रोजी करण्यात आली असून श्री.किशोर भगवानराव फडतरे,निंबोडी यांची चेअरमन पदी तर श्री.पुरुषोत्तम शिवाजीराव गाढवे, आंबी यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मा.श्री. श्रीकांत श्रीखंडे,अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांनी काम पाहिले. सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.संभाजी नाना होळकर,तालुकाध्यक्ष श्री.संदीप तात्या बांदल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सौ.वनिताताई लडकत,बाजार समितीचे सभापती श्री.विनायक गावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,मा.संचालक मंडळ, संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.श्री.योगेश राणे व उपमहाव्यवस्थापक श्री.अमोल चव्हाण इ.उपस्थित होते.