
बारामतीत मुसळधार पावसाची हजेरी; पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ.
बारामती शहर आणि परिसरात सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बारामतीत सध्या जोरदार पावसासह वेगवान वारे वाहत आहेत. वादळी वाऱ्याचा वेग इतका आहे की रस्त्यांलगतची झाडे आणि उभी असलेली वाहनेही हलू लागली आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला असून वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे.