उद्योगपतींना जमिनी मिळवून देण्यास महसूल व यवत यवत पोलीस प्रशासनाचा लंपटपणा अखेर शेतकरी महिलांवरती अन्याय

Photo of author

By Sandhya

दौंड तालुका पाटस पाटील मळा या ठिकाणी दोन वर्षापासून स्थानिक शेतकऱ्यांच्या कमी भावात जमिनी विकत घेऊन मोठ्या उद्योगासाठी कानगाव व पाटस दोन्ही गावांच्या सीमेवरती एक खटी जमीनी गोळा करण्याचे काम सध्या जोरात चालू आहे यामध्ये पाटण स्टेशन लोहमार्गाच्या शेजारच्या मोठ्या उद्योगाचा शेत जमिनीवरती डोळा असल्याचे दिसून येत आहे या जमिनीचा ताबा घेण्यासाठी दौंड शिरूर श्रीगोंदा तालुक्यातील सराईत गुन्हेगार या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत जमिनी खरेदी विक्री करणारा महारथी पोलीस प्रशासन आणि गुन्हेगार यांना एकाच खिशात घालून मिरवताना दिसत आहे पाटस स्टेशन ते पाटील मळा या भागामध्ये सुमारे 60 एकर जमीन हस्तगत केल्याची दिसत आहे आशा जमिनी खरेदी-विक्रीमुळे दौंड महसुली अधिकाऱ्यांना चांगले सुगीचे दिवस आले आहेत आज गुरुवार दिनांक11 रोजी पाटील मळ्यातील पुन्हा एकदा पोलीस महसूल अधिकारी व सराईत गुन्हेगार यांनी एकत्र येऊन शेतजमीन महिलांना कायद्यातील कोणतीही नोटीस न देता दहशतीखाली एका बड्या उद्योजकाला जमिनी हस्तगत करून दिली शेतकरी महिलांच्या आक्रोश मोठ्या प्रमाणे दिसून आला मात्र पाटस गावातील एकही नेता महिलेच्या मदतीसाठी आला नाही भविष्य काळामध्ये पाटस व कानगाव परिसरातील शेतकरी महिला असुरक्षित राहतील की काय असा प्रश्नचिन्ह उधभत होत आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page