चौफुला रेणुका कला केंद्रात गोळीबार,,,,आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासनाला यश

दौंड तालुक्यात बोरीपारधी येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गा चौफुला रेणुका कला केंद्र या ठिकाणी शुक्रवार दिनांक 12 जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता दोन्ही गटाच्या वादातून गावठी पिस्तूलचा गोळीबार करुन सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवली सदर या घटनेची केडगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सोमनाथ माने लेखी तक्रार दिलीआहे गोळीबार करणारे आरोपी पवन बर्मा व मयुर पाटील व इतर त्यांचे साथीदार मु, पो उरुळी तालुका हवेली जिल्हा पुणे दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद होऊन सदर ही घटना घडली आहे गावठी पिस्तुलाच्या गोळीबार मुळे रेणुका सांस्कृतिक कला केंद्रातील महिलांमध्ये मोठी घबराहाट निर्माण झाली कला केंद्रामध्ये एकूण 25 पार्ट्या असल्याने अठरा ते 30 वयोगटातील तरुण वर्गाची संख्या सांस्कृतिक कला केंद्र मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसत आहे चौफुला कला केंद्र मध्ये पारंपारिक वाद्याला फाटा देऊन डीजे चा वापर केला जातो अशा वाद्यांमुळे डान्स बारचे स्वरूप आले आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तरुण वर्ग चौफुला परिसरातील कला केंद्रांना हजेरी लावताना दिसत आहे यामध्ये ओल व सुखी पार्टी लावण्याकडे तरुण वर्गाचा मोठा कल आहे या घटनेतील आरोपींना केडगाव उप पोलीस निरीक्षक किशोर वागज यांनी तात्काळ अटक केली आहे