Fierce protest on the steps of the Legislative Assembly building over the paper leak scandal.

Photo of author

By Sandhya

विधानभवनच्या पायऱ्यांवर पेपर फुटी प्रकरणावर उग्र आंदोलन

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात नेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध

पेपर फुटीचा गुन्हेगार, राज्य सरकार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय?

आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चा दुसरा आठवडा. गेल्या आठवड्यात नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, आता टी. ई. टी. चा पेपर ठाण्यातून फुटल्याच समोर आलाय. काल टी. ई. टी. ची परीक्षा होती, हे माहित असून सुद्धा पेपर फुटी होतेय. केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी नुकतीच अभिजीत दिपके यांची कोक्रोच जनता पार्टी निर्माण झाली. त्यांनी देशभर आंदोलन केली. आता महाराष्ट्र मध्ये असं वारंवार होतंय. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. असं असताना सुद्धा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान स्वतःहून राजीनामा देत नाहीत. यावरून विरोधी पक्षाच्या वतीने विधान भवनच्या पायऱ्यावर घोषणा देत उग्र आंदोलन छेडले.

Leave a Comment

You cannot copy content of this page