School Education Minister Dadaji Bhuse clarifies his stance to the media regarding the TET paper leak case.

Photo of author

By Sandhya

टीईटी पेपरफुटी प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांची माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्यात येणार असून,या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकांची छपाई अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित पद्धतीने केली जाते. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वेळेत कारवाई करून हा गैरप्रकार उघडकीस आणला गेला.विशेष म्हणजे,घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी स्वतःहून केलेल्या या कारवाईमुळे मोठा गैरप्रकार टाळला गेला.

राज्यातील आगामी सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक,निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यात येतील.परीक्षेच्या पवित्रतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,अशी सरकारची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल,त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास संबंधितांवर मोकोका अंतर्गतही कारवाई करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page