

माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सदस्यपदी खा.पार्थ अजित पवार व युवा नेते युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.तसेच संस्थेच्या पोटनियमानुसार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष हे या संस्थेच्या उपाध्यक्ष असतात.यानुसार कारखान्याच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संस्थेचा उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी विश्वस्त ॲड.राजेंद्र काटे,धन्यकुमार जगताप,विराज खलाटे, प्रवीण पोंदकुले,ॲड.मोहन नेवसे, रोहन देवकाते,सचिव डॉ.धनंजय ठोंबरे,निमंत्रीत सदस्य गणपतराव देवकाते,आशा जराड उपस्थित होते.
दरम्यान पार्थ पवार व युगेंद्र पवार या दोन युवकाची निवड करण्यात आल्याने संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी,तसेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मोठी मदत होईल असा विश्वास अध्यक्ष खा.शरद पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.