



पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका यवत येथे सत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी चार वाजता दौंड हद्दीमध्ये तालुक्याचे आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात वैशाली नागवडे आप्पासाहेब पवार दौंड सभापती सुखदेव चोरमले नितीन दोरगे सुशांत दरेकर सागर शितोळे सागर शेलार इतर मान्यवरांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले . ज्ञानोबा तुकारामचा गजर करत तुकोबांचे पालखी संध्याकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी यवत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्कामी पोचली यवत ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले त्यानंतर तुकोबाची आरती घेण्यात आली महाप्रसाद म्हणून भाविक भक्तांना पिठलं भाकर भोजनासाठी देण्यात आले जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी यवतचा मुक्काम आटपूण सोमवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी आठ वाजता वरवंड रवाना झाली तसेच भांडगाव भांडगाव चौफुला संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर वरवंड मध्ये पोचली वरवंड ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सदिप ठवाळ पालखीच्या व्यवस्थापनाची माहिती दिली