Horrific accident on the Jejuri-Saswad route; three female Warkaris killed after being run over by a truck accompanying the Dindi procession.State Deputy Chief Minister Sunetra Pawar visits the hospital to inquire about the situation.

Photo of author

By Sandhya

जेजुरी–सासवड मार्गावर भीषण दुर्घटना; दिंडीतील ट्रकखाली तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याची रुग्णालयात चौकशी

जेजुरी–सासवड मार्गावर आषाढी वारीदरम्यान अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, भरधाव ट्रकने तीन महिला वारकऱ्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून, संपूर्ण वारी मार्गावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील एका दिंडीचा ट्रक हिंगोली येथील दिंडीसोबत पायी चालणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या अंगावर गेला. संबंधित महिला रस्त्याच्या कडेला शिस्तबद्धपणे चालत असतानाच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालय येवून जखमींची भेट घेऊन केली विचारपूस .
या अपघातात राजेश्री शंकर भोसले, कसबे डिग्राज, माधवी राजाराम सलगरे रा मळगाव मिरज व नंदा पवार कौलापुर या तीन महिला ठार झाल्या .
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून, जखमी असल्यास त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि ट्रकचालकाची जबाबदारी याचा तपास पोलीस करत आहेत.

या दुर्घटनेनंतर यंदाच्या आषाढी वारीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाखो वारकरी पायी वारी करत असताना वाहतूक नियंत्रण, जड वाहनांवर देखरेख आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली उपाययोजना अपुरी पडल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या वारी बंदोबस्ताबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, सुरक्षा नियोजनातील त्रुटी समोर आल्याची चर्चा आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी वारकरी, नागरिक आणि विविध संघटनांकडून होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page