
दिनांक 13 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी , नागपूर आयोजित कार्यक्रमात महिला वारकऱ्याना हायजेनिक किट व सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
जेजुरी येथे दिनांक 13 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी , नागपूर यांच्या वतीने पंधरा हजार वारकऱ्यांना हायजेनिक किट तसेच महिला भाविकांना सॅनिटरी पॅड वाटण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या संस्थांनचे अध्यक्ष असून त्यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, पदाधिकारी गणेश जगताप, नवनाथ पडळकर,अलका शिंदे,मंगल पवार, विक्रम माळवदकर, प्रकाश भापकर, शिवाजी बारसुडे, प्रकाश भामे, आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन संस्थान चे पदाधिकारी दत्तात्रेय समरीटकर, केशव फुलझले, रवींद्र काळे, देवेंद्र नक्षीने आदींनी केले.