मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56 वाढदिवसानिमित्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव, कॅलिपर व सपोर्टिव्ह स्टिक (काठ्या) वाटप उपक्रम

Photo of author

By Sandhya


महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त समाजातील दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच चालण्यास अडचण असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते 560 दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर तसेच ज्येष्ठ नागरिक व पायांच्या आजारामुळे चालण्यास अडचण असलेल्या रुग्णांना सपोर्टिव्ह स्टिक (काठ्या) यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या प्रसंगी महापौर मा. मंजुषाताई नागपुरे म्हणाल्या, “मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम, स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.”

या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, ज्येष्ठ नागरिकांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक आधार उपलब्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या सेवेसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ, नागरिक तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि जनसेवेचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page