







तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठात विविध धार्मिक उपक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या व ऐतिहासिक होळकर तलावाकाठी श्री स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात रुद्राभिषेक, महापूजा आरती, तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे तीनशे महिलांनी घ्यानं मंदिरात स्वामी साराअमृत ग्रंथाचे पारायण केले. सायंकाळी श्री स्वामींच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.दिवसभर मठात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गुरुपौर्णिमा उत्सवानिमित गाभराव मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
या उत्सवाचे नियोजन श्री स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गणेश मोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, सचिव माऊली खोमणे, संदीप घोरपडे, कबीर मोरे,महेश कदम,अमोल नाकाडे,निलेश देशपांडे,सदाशिव शिंदे पुजारी प्रवीण हेंद्रे आदींनी केले.