

२२ जुलै रोजी सकाळी १०.३० वा.पिंपरी साकेरी ता आंबेगाव जि पुणे येथील युवक दिपक खाडे हा पाण्याबाहेर मोटर काढल्यानंतर शेजारी स्टार्टर खोलत असलेल्या भावालाही ही गोष्ट समजन्या आधीच दिपक पाण्यामध्ये वाहून गेला,या घटनेची माहिती पाटणचे सरपंच लक्ष्मण मावळे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला कळवली,दीपक खाडे या १८ वर्षीय युवकाचा शोध घेण्यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे Api सागर पवार यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि ग्रामस्थांचा मदतीने शोधकार्य चालू केले,पण दीपक मिळून आला नाही,त्यानंतर NDRF ला बोलवण्यात आले,तहसिलदार सारंग सर यांनीही घटनास्थळी टीम पाठवून शोधकार्य सुरू ठेवले,पण शोधकार्यात मुसळधार पावसामुळे शोध मोहीम अडथळे येत होते,आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन ची टीम धनंजय कोकणे तसेच psi महेश पवार यांनीही आठ जणाच्या टीमसह पूर्ण धरणक्षेत्रात जाऊन सर्चिंग ऑपरेशन केले,बॉडी खडकात किंवा दगडात अडकून असल्याने त्यामध्येही त्यांना काही आढळून आले नाही,शेवटी ९ दिवसानंतर दिगद ता आंबेगाव येथील धरणाच्या कडेला गाळात दिपक खाडेचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला.अखेर २२ जुलै ला वाहून गेलेला युवकाचा मृतदेह ३० जुलैला ९ दिवसांनंतर सापडला.