पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेले नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरले.45 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.आत्ता पर्यंत 320 मिमी पाऊसाची नोंद.

Photo of author

By Sandhya

जेजुरी वार्ताहर दिनांक 1 सदैव दुष्काळी असणाऱ्या पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेले व पुरंदर व बारामती तालुक्यातील 45 गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारे नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

जेजुरी जवळील नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट म्हणजेच पाउन टीएमसी असून मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट एवढा आहे.  तर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 496 मिमी आहे. दरवर्षी पुरंदर मध्ये कमी पाऊस पडत असल्याने सतत तालुक्याला दुष्काळाला सामोरे जावे लागते. 
जून पासून आत्ता पर्यंत नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  320 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. 

नाझरे धरणातून जेजुरी शहर,जेजुरी औद्योगिक वसाहत,नाझरे प्रादेशिक योजना आदी 30 हून अधिक गावे तर बारामती तालुक्यातील 16 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच सुमारे एक हजार हेक्टर शेतीला हंगामी स्वरूपाचे पाणी मिळणार आहे.
गतवर्षी सरासरी पेक्षा दुप्पट पाऊसाची नोंद झाली होती.गेल्यावर्षी में आणि जून महिन्यात प्रचंड पाऊस झाला होता.त्यामुळे जून महिन्यातच धरण भरले होते. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात धरणातील पाणीसाठा मृत साठ्याच्या खाली गेल्याने पाणी टंचाईची परिस्थती निर्माण झाली होती मात्र दोन महिन्यात चांगला पाऊस झाल्याने व धरण भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

 अजूनही समाधान कारक पाऊस न झाल्याने येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page