राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार असे गट झाल्यापासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अशात आमदार रोहित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेला देखील भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
त्या रोहित पवारला सांगा तुझा जन्म झाला नव्हता तेव्हा मी आमदार होतो अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला आहे. माझ्यावर टीका कर्णयापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या,त्यांना इतिहास माहिती नाही असं भुजबळ यावेळी म्हणालेत.
मी १९८५ मध्ये आमदार झालो.. मुंबईचा महापौर झालो त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला असा टोला देखील भुजबळांनी यावेळी रोहित पवारांना लगावला. त्यामुळे मला मोठं केलं.. मला मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करू नका इतिहास जाणून घ्या.
छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे आला नव्हता मी शिवसेनेचा नेता होतो, आमदार होतो असं देखील भुजबळांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
अजित पवार आणि तुमचं पवार घराणं ठरवून शरद पवारांचा राजीनामा द्यायचा हे करता तेव्हा आम्हाला सांगितलं होत का ? मी त्याला जास्त किमंत देत नाय ते जेवढे पुढे येतील तेवढा मी त्यांच्या मतदार संघात जाऊन त्यांना उत्तर देईल असा इशारा देखील भुजबळांनी यावेळी दिला.
काय म्हणाले होते रोहित पवार नेमकं ? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकच्या अनेक आठवणी सांगतात. शरद पवार येवल्यात आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील असं म्हणत रोहित पवार यांनी भुजबळांचं नाव न घेता टीका केली होती. रोहित पवारांच्या या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिल.