विक्रोळी टागोरनगरमधील महापालिकेच्या एका शाळेतील चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आज (दि.२२) उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या ४ मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करीत असल्याची माहिती काही मुलींनी त्यांच्या पालकांना दिली होती.
त्यांनतर पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या आज हवाली केले आहे. यावेळी पोलिसांनी पालकांना घरी जावे, अशी विनंती केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
त्यांनी पोलिसांचा निषेध करत पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.