दादा भुसे : परवडत नसेल तर कांदा खाऊ नका…

Photo of author

By Sandhya

कांदा

कांदा निर्यातीच्या शुल्कात केंद्र सरकारने वाढ केल्याने शेतकरी संतप्त झाले असतानाच राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावर सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले.

निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांदा महाग झाला असेल आणि तो परवडत नसेल तर तो चार महिने खाऊ नका, काही बिघडत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

आपण एक-दोन लाख रुपये किमतीचे वाहन वापरतो आणि कांदा दहा-वीस रुपयांनी महाग झाला तर त्या विरोधात आंदोलन सुरू करतो. हे योग्य नाही. ज्यांना कांद्याचा सध्याचा दर परवडत नाही, त्यांनी तूर्तास तो खाऊ नाही, असे भुसे म्हणाले.

निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र निर्यात शुल्क वाढविणे अथवा कमी करणे हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे.

त्यामुळे आपण केंद्रीय मंत्र्यांशी या विषयावर लवकरच चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment