महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला गती आली आहे. आतापर्यंत 450 कोटी रुपयांचे वाटप झाले असून, 602 कोटी शिल्लक आहेत. या रस्त्याचे नकाशांद्वारे जीएसआय मॅपिंग होणार आहे.
रिंग रोडसाठीच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. स्वेच्छेने अगोदर येणार्या शेतकर्यांची निवड प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येत असल्याची माहिती रस्ते महामंडळाकडून देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहेत. प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
त्यानुसार पश्चिम भागातील जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. दर निश्चित झाल्यानंतर भूसंपादन नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र, काही स्थानिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मूल्यांकन प्रक्रियेत तफावत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित गावकर्यांच्या मागण्या पाहून प्रांतनिहाय चौकशीचे आदेश देत नोटिशींबाबत मुदतवाढीचा निर्णय दिल्याने शेतकर्यांनी भूसंपादनाला सहमती दर्शवली आहे.
अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी वर्तुळाकार रस्त्याची पश्चिम आणि पूर्व अशा दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. पश्चिम भागाचे मूल्यांकन होऊन निवाडा प्रक्रियेद्वारे सहमती घेऊन भूसंपादन करण्यात येत आहे.
यातील पूर्वेकडील चार गावांचा समावेश आहे. पूर्व भागातून मावळ तालुक्यातील 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील पाच, तर भोरमधील तीन गावे बाधित होणार आहे.