सुषमा अंधारे : 40 आमदारांना राख्या बांधण्याची इच्छा

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे : 40 आमदारांना राख्या बांधण्याची इच्छा

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा स्वराज संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांवर हल्ला चढवतात.

पण आता त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिंदे गटाच्या आमदारांना राख्या बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या यासंबंधीच्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंधारे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने 40 राख्या खरेदी केल्या आहेत. या राख्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना बांधणार आहेत.

शिंदेंसोबत गेलेले 40 जण माझे भाऊ आहेत. त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. आज त्यांच्यापैकी किमान एका तरी भावाने माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावे, अशी इच्छा अंधारे यांनी बोलून दाखवली आहे.

अंधारे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका करतात. त्या कधी शेलक्‍या तर कधी अत्यंत जहाल शब्दांत त्यांच्यावर हल्ला चढवतात.

पण रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी अचानक शिंदे सेनेच्या आमदारांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. त्यांच्या या इच्छेला शिंदे गटाचे आमदार कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

काहींनी अक्षम्य अपराध केला सुषमा अंधारे यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारेही एकनाथ शिंदेंच्या आमदारांना भावनिक साद घातली होती. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, “कुठल्याही बहिणीला आपला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावे, असे मनापासून वाटते.

महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहीलो. कारण यातल्या काहींनी निश्‍चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे. तरीही त्यांनी माझ्याकडे राखी बांधण्यासाठी यावे.’

Leave a Comment

You cannot copy content of this page