पादचारी दिनानिमित्त पुणे महापालिकेकडून दि. ११ डिसेंबर रोजी वाॅकिंग प्लाझा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी लक्ष्मी रस्ता सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वाहतुकीस बंद राहणार आहे.
लिंबराज महाराज चौक ते गरुड गणपती मंडळ दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग – लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लिंबराज महाराज चौकातून (सेवासदन चौक) टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौकातून उजवीकडे वळावे. – कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी चितळे बंधू मिठाईवाले दुकानाजवळून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. – रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्याकडे न जाता केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे जावे