मराठा आरक्षणाचा विषय अंतीम टप्यात आला आहे. आरक्षणासाठी मराठा युवकांचे बळी गेले त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. जरांगे यांनी युवकांना सल्ला देताना नुसता आरडाओरडा करून चालणार नाही.
मराठ्यांना वेढा आणि षड्यंत्र ओळखून ते तोडल्या शिवाय आरक्षण मिळणार नाही व गत्यंतर नाही. यासाठी मराठ्यांनी काळाची पावले ओळखून शांतता ठेऊन आंदोलन करावे.
शेवटच्या टप्यात आलेली आरक्षणाची लढाई संयम न तुटू देता कार्य केल्यास ती जिंकणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. १७ डिसेंबरला आरक्षण लढाई संदर्भात अंतिम निर्णय न झाल्यास मराठे पळता भुई थोडी करतील असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नायगावच्या सभेत सरकारला दिला आहे.
दि. 8 डिसेंबर रोजी नायगाव येथे सायंकाळी मराठा संघर्ष योद्धा यांची सभा संपन्न झाली. या प्रसंगी शहरात हेडगेवार चौक ते शिवाजी चौक सभेच्या व्यासपीठापर्यंत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून सभास्थळी रॅम्पद्वारे आणण्यात आले. या वेळी 51 तोफांची सलामी ही सभेचे आकर्षण ठरली. यावेळी सभास्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून सभेला सुरवात केली.
पुढे बोलताना त्यानी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा ही जात जगाचा पाटीवर शांत आहे, पन ऐखाद्याच्या पाटीमागे लागलो तर शांत बसणार नाही. आसा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
प्रत्येक आई वडीलांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी ही संधी आली असून, आपल्याला लढायचं आहे. सद्या आपली गत अशी झाली, शेती आपल्याला साथ देत नाही.
निसर्ग पिच्छा सोडत नाही, शिकूण घरी राहाणे परवडणारे नाही. आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. तेंव्हा जागे व्हा.
ही वेळ खुप मोलाची आहे. मराठ्यांनो एकजुट व्हा असा संदेश त्यांनी यावेळी मराठा युवकांना दिला. महाराष्ट्रात मराठ्यांचा सातबारा असून, येथील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बसस्थानक, सरकारी कार्यालये यास आपल्या जमीनी फुकट दिल्यात. हे सांगून त्यांनी छगण भुजबळांचा चिमटा काढला.
आता मराठ्यानी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे माझा जीव गेला तरी चालेल मी माझ्या आईवडीलांना सांगीतलंय मी मेलो तर तीन मुलांवर समाधान मानावं बायकोला कपाळ पुसुन बस असं सांगितलय.
माझ्या जीवाची बाजी लावणार. एक पाउलही मागे हटणार नाही. मेलो तर चार कोटी समाजाचा वाचलो तर तुझा असे सांगुन घराच्या बाहेर निघालो.
आरक्षणाक्षीवाय पर्याय नाही आणि ते घेतल्या शिवाय स्वस्त बसनार नाही. याचवेळी त्यांनी मराठ्यांच्या ३५ लाख नोदीं सापडल्या आहेत. सर्वांना आता जातीची प्रमाण पत्र मिळत आहेत. पण आपणास सरकट आरक्षण हवे आहे. ते मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असे सांगत उपस्थित समुदायास त्यांनी संबोधित केले. सभेस जनसागर उसळल्याने ही शहरातील लाक्षणिय सभा ठरली.