भरधाव ट्रकने मालवाहतूक करणारे वाहन आणि रिक्षाला रविवारी रात्री कल्याण-नगर महामार्गावर धडक दिली. अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला.
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अपघात झाला. अपघातात दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बागेजवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास भरधाव ट्रकने मालवाहतूक करणारे पिकअप वाहन, रिक्षाला धडक दिली.
अपघातात पिकअप वाहन आणि रिक्षातील आठ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.