PUNE CRIME : अतिशय धक्कादायक..! पत्नी ‘आय लव्ह यू’ बोलली नाही म्हणून पतीने केली बांबूने मारहाण

Photo of author

By Sandhya

PUNE CRIME : अतिशय धक्कादायक..! पत्नी ‘आय लव्ह यू’ बोलली नाही म्हणून पतीने केली बांबूने मारहाण

बहिण्याच्या घरी गेलेली पत्नी फोनवर ‘आय लव्ह यू’ बोलली नाही. याची राग मनात धरुन पतीने पत्नीला बांबूने बेदम मारहाण केली. यानंतर झाडावर ढकलून देत शिवीगाळ केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,हे दांम्पत्य लेक डाऊन सोसायटी येथे राहते. पत्नी काही कामानिमित्त तिच्या बहिणीला भेटायला गेली होती. यावेळी घरी आलेल्या पतीने तिला दारूच्या नशेत फोन केला.

तिला फोनवर ‘आय लव्ह यु’ बोलण्याचा आग्रह केला. मात्र पत्नीने बहिणसमोर असे बोलण्यास नकार देत फोन ठेऊन दिला. यानंतर पत्नी घरी परतल्यावर पतीने तिला ‘आय लव्ह यू’ का बोलली नाही? असा जाब विचारला.

तिला बांबूने मारहाण करत एका झाडावर ढकलून दिले. दुखापत झाल्याने पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोपाळ माने करत आहेत

Leave a Comment