लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघात शाहू छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा असेल अशी मोठी घोषणा आज (दि.२३) पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
कॉंग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार महाविकास आघाडीत पाच जागांवरील तिढा अद्याप आहे. त्यांच्यामध्येच अजून जागा वाटपाचे ठरत नाही तर आम्ही आघाडीत येवून काय करणार असा सवाल करत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
आता २६ मार्च पर्यंत आम्ही आमची भूमिका मांडू, तोपर्यंत आघाडीने निर्णय घ्यावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना ते म्हणाले कॉंग्रेसला आम्ही सात जागांवर पाठिंबा देणार.
कॉंग्रसेने त्यांच्या सात जागा कळवाव्या. प्रकाश शेंडगेंकडून यांच्याकडुनही .युतीचा प्रस्ताव आला आहे. आता आम्ही २६ मार्च पर्यंत महाविकास आघाडीच्या निर्णयाची वाट पाहू.
त्यांच्यामध्ये कोणता तिढा आहे हे आम्हाला माहित नाही. त्यांच्यातील वाद मिटलेले नाही. कॉंग्रेसला कोणत्या सात जागांवर पाठींबा हवा आहे, हे आम्हाला कळवावे. असेह यावेळी त्यांनी स्पष्ट करत म्हणाले, आमचं टार्गेट भाजप आहे.